निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर अलिबाग नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी केली शहरातील किनारपट्टीची पाहणी

अलिबाग राजेश बाष्टे:-निसर्ग चक्रीवादळच्या पार्श्वभूमीवर केंद्राचा आपत्ती व्यवस्थापन टीम ( NDRF ) बरोबर नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी आपल्या सर्व सहकार्यांसोबत शहरातील किनारपट्टीची पाहणी केली. तसेच सर्व नागरीक ज्यांची कच्ची घरं आहेत अशा लोकांना पक्क्या घरांत स्थलांतरीत होण्याच्या सूचना केल्या व ज्यांची तशी सोय नसल्यास अशांची व्यवस्था नगरपरिषदे मार्फत कोएसो शाळेत करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.सावध राहा, काळजी घ्या.असे आवाहन करण्यात आले आणि  शासकीय  सूचनेनुसार बुधवार दिनांक ०३/०६/२०२० रोजी येऊ घातलेल्या चक्रीवादळामुळे खबरदारी म्हणून अलिबाग शहरातील सर्व बाजारपेठ, दुकाने, भाजी मार्केट, मच्छी मार्केट, रिक्शा पूर्ण दिवस बंद  ठेवण्यात येणार आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button