
भाजपकडून नारायण राणे यांच्या नावावर जोर, तर दुसरीकडे किरण सामंत जागा लढवण्यावर ठाम
तिसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरायला येत्या 12 एप्रिल पासून सुरु होईल. मात्र, अजूनही महायुतीच्या काही जागा वाटपाचा पेच सुटलेला नाही.राज्यात पहिल्या टप्प्यातील प्रचाराने जोर धरला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चंद्रपूरमध्ये पहिली सभा देखील पार पडली. महाविकास आघाडीचे उमेदवार निश्चित झालेत पण महायुतीच्या काही जागाचा पेच काही सुटताना दिसत नाही. पेच सुटत नसल्याने इच्छुक उमेदवारांची चांगलीच डोकेदुखी वाढली आहे.सर्वाधिक चर्चा सध्या याच लोकसभा मतदार संघाची सुरु आहे..या लोकसभा मतदारसंघासाठी शिवसेनेकडून किरण सामंत इच्छुक आहेत. तर दुसरीकडून भाजपकडून नारायण राणे यांच्या नावावर जोर दिला जातोय.एकीकडे किरण सामंत जागा लढवण्यावर ठाम तर दुसरीकडे भाजपचा दावा यामुळे या जागेचा पेच दिवसेंदिवस वाढत चालला आहे.महायुतीच्या जाहीर न झालेल्या जागामुंबई उत्तर-मध्यमुंबई उत्तर-पश्चिमठाणेनाशिकपालघरऔरंगाबादसातारारत्नागिरी-सिंधुदुर्गwww.konkantoday.com