विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर दूरगामी परिणाम करणारा निर्णय घेवून त्यांच्यावर एकप्रकारे अन्याय केला-अभाविप
महाराष्ट्रातील सध्याची कोरोना व्हायरसची परिस्थिती पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील अंतिम वर्षांच्या परीक्षा रद्द करत, सरासरी गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतला. याच पार्श्वभूमीवर त्यांच्यावर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने प्रतिक्रिया दिली आहे. शैक्षणिक गुणवत्तेशी तडजोड करत मुख्यमंत्र्यांचा हा लोकप्रियता मिळवण्यासाठीचा दुर्दैवी प्रयत्न असल्याचा नाराजीचा सूर त्यांनी आळवला.
विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर दूरगामी परिणाम करणारा निर्णय घेवून त्यांच्यावर एकप्रकारे अन्यायच सरकारने केला असल्याची भूमिका अभाविपकडून स्पष्ट करण्यात आली.
www.konkantoday.com