
श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या उपाध्यक्षा कंदाताई खेडेकर यांचे वाराणसी येथे निधन
चिपळूणचे माजी आमदार बापूसाहेब खेडेकर यांच्या पत्नी व श्रीराम एज्युके शन सोसायटीच्या उपाध्यक्षा सामाजिक कार्यकर्त्या श्रीमंती कुंदाताई सूर्यकांत खेडेकर यांचे श्री क्षेत्र वाराणसी येथे काल मंगळवार दि. ६ जानेवारी रोजी अंगारकीच्या दिवशी पहाटे हृदयविकार्याने निधन झाले. मृत्यूसमयी त्या ७१ वर्षांच्या होत्या.
आपल्या मैत्रिणींबरोबर त्या देवदर्शनसाठी गेल्या होत्या. काल मंगळवारी सकाळी श्री काशी विश्वेश्वराच्या पूजेसाठी त्या मैत्रिणींसह जाणार होत्या. दुर्दैवाने पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. चिपळूणमध्ये त्यांच्या निधनाच्या वृत्तामुळे अनेकांनी तीव्र हळहळ व्यक्त केली. बापूसाहेब यांच्या आमदारकीच्या काळात त्यांना समर्थपणे साथ देतानाच कौटुंबिक जबाबदार्या त्यांनी यशस्वीपणे सांभाळल्या. प्रगती महिला मंडळाच्या अध्यक्षा आणि वैश्य समाज चिपळूण या संस्थेवर विश्वस्त म्हणूनही त्या कार्यरत होत्या. नुकतीच श्रीराम एज्युकेशन सोसायटीवर त्यांची उपाध्यक्षा म्हणून फेरनिवड करण्यात आली होती.www.konkantoday.com




