
इतर राज्यांची जीएसटीची भरपाई थकली आहे पणअगदी लहान राज्यंही त्यासाठी तुमच्याप्रमाणे रडत बसलेली नाहीत-देवेंद्र फडणवीस
कोरोनाच्या संकटामुळे केवळ महाराष्ट्रच नव्हे तर देशातील इतर राज्यांची जीएसटीची भरपाई थकली आहे. मात्र, तरीही अगदी लहान राज्यंही त्यासाठी तुमच्याप्रमाणे रडत बसलेली नाहीत, असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला लगावला आहे.
फडणवीसांनी महाविकास आघाडी सरकारकडून जीएसटी थकबाकीविषयी करण्यात आलेल्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. जीएसटीची भरपाई ही केंद्र सरकारने देणे अपेक्षित नाही. ही भरपाई जीएसटी कौन्सिलच्या फंडातून देण्यात येते. मात्र, आता या फंडातील रक्कम संपल्यामुळे जीएसटीची भरपाई देणे शक्य नाही, असं ते म्हणाले.
एकट्या महाराष्ट्राची जीएसटीची रक्कम थकलेली नाहीमहाराष्ट्रापेक्षा आणखी कितीतरी राज्यांचे जास्त पैसे थकलेले नाहीत. मात्र, त्या राज्यांच्या अर्थमंत्र्यांना ही बाब माहिती आहे. त्यामुळे ते जीएसटीच्या पैशासाठी रडत न बसता लढत आहेत, असं ते म्हणाले.
राज्य सरकार कोरोना परिस्थिती हाताळण्यात आलेले अपयश लपवण्यासाठी दररोज नवनवे मुद्दे उकरून काढत आहे. हे एकप्रकारचे कव्हरिंग फायर आहे, अशी टीकाही त्यांनी ठाकरे सरकारवर केली.
www.konkantoday.com
शिका उद्याची कौशल्य आजच
आय रोबोकीड रत्नागिरी घेऊन आले आहे ऑनलाइन सर्टिफिकेशन कोर्स
मिळवा ५० % डिस्काउंट हा कोड वापरुन
RATNA500
अधिक माहितीसाठी
http://futurelearning.irobokid.com/s/store
Learn Tomorrow’s skills,Today!
irobokid Ratnagiri Brings you
Online certificate courses for Std : 4 +
Special offer – 50% off.
For more information-
http://futurelearning.irobokid.com/s/store
