विनापरवाना मातीचे उत्खनन करणार्‍याला ६ कोटी रुपये दंडाची नोटीस

संगमेश्‍वर एस.टी. स्टँडजवळ मारूती मंदिर डोंगरासमोरील माती विनापरवाना उत्खनन केल्याबद्दल संबंधिताने ६ कोटी रुपये दंड भरण्याची नोटीस तहसिलदार कार्यालयाने बजावली आहे.
एका भंगार व्यावसायिकाने सदरचा डोंगर व परिसरातील जमीन स्थानिक ग्रामस्थांकडून विकत घेतली होती व त्याने डोंगरातील मातीचे उत्खनन करणार्‍या कोणत्याही शासकीय खात्याची परवानगी घेतलेली नव्हती. तसेच उत्खनन केलेली माती कोंडवी नदीपात्रात टाकण्यात आली होती. त्यामुळे दुतर्फा असलेल्या वस्तीला धोका निर्माण झाला होता. याबाबत ग्रामस्थांनी जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार केली होती. त्यामुळे तहसिलदार कार्यालयाने त्याला दंडाची नोटीस पाठवली आहे.
www.konkantoday.com

Buy products on Amazon at best price

Looking to compose Tablet,First aid, etc at one place then here is best option for you

Milton Medical Box

Price – 199/- only (click on image to buy )

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button