रत्नागिरी जिल्ह्यात अजून १६ जणांना डिस्चार्ज, आतापर्यंत ३३ जणांची कोरोनावर मात
रत्नागिरीकरांना दिलासादायक बातमी आली आहे.कोरोना वर यशस्वी रित्या मात करुन उपचार पूर्ण केलेल्या १६ जणांना आज रुग्णालयामधून घरी सोडण्यात आले आहे. यामुळे बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या आता ३३ झाली आहे.
एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या – ९२
बरे झालेल्यांची संख्या – ३३
मृत्यू – ३
ॲक्टीव्ह कोरोना बाधित रुग्ण – ५६
मिरज येथून आज सायंकाळपर्यंत १०८ अहवाल प्राप्त झाले. हे सर्व अहवाल निगेटिव्ह आले आहेत.याचे विवरण खालीलप्रमाणे
रत्नागिरी – ७४
संगमेश्वर -१८
गुहागर – १३
मंडणगड – ३
www.konkantoday.com