
धावत्या रेल्वेची चेन खेचणार्या दोघांना ५०० रु. दंडाची शिक्षा.
कोकण केल्वे मार्गावरील धावत्या रेल्वेची चेन खेचणार्या दोघांना न्यायालयाने ५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली. शिवाजी मोतीराम महाडीक व गौरव कुमार अशी दोघा संशयितांची नावे आहेत. त्यांच्याविरूद्ध भारतीय रेल्वे कायदा १४१ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. शिवाजी महाडीक याने २ एप्रिल २०२५ मध्ये कोकण रेल्वे मार्गावरील मंगला एक्सप्रेस गाडीमधून प्रवास करताना चेन ओढली होती. तर गौरव कुमार याने २३ एप्रिल २०२५ रोजी मंगला लक्षद्वीप एक्स्प्रेस गाडीची चेन ओढल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता.www.konkantoday.com