GJC 95 फॅमिली या माजी विद्यार्थी संघटनेतर्फे 57000 रूपयाचे घरगुती साहित्य वाटप


गोगटे जोगळेकर महाविद्यालयामध्ये 1995 साली शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थी मित्र मैत्रिणीनी कोरोना सारख्या पसरलेल्या दुर्धर आजारामध्ये, रोजंदारी करणाऱ्या लोकांना सहकार्य करण्यासाठी एका कुटुंबातील लोकांना 15 दिवसाचे जेवणाचे साहित्य पुरेल अश्या 103 कुटूंबाना देण्यासाठी 57000 /- रुपये जमा करण्यात आले आहेत आणि वस्तूचे वाटप करण्यासाठी नाचणे -गुरूमळी , कुवारबाव-कारवांचीवाडी , मि-या गांव , रत्नागिरी बाजारपेठ आणि आजूबाजूचा परीसर अश्या टीम करण्यात आल्या आहेत .
विषेश म्हणजे 15 दिवसाचे जेवणाच्या साहित्याबरोबर कोरोना व्हायरस पासून बचाव करण्यासाठी साबण सुद्धा देण्यात आला आहे. GJC 95 हे माजी विद्यार्थी मैत्री संघटन गेली 15 वर्ष सक्रिय आहे .व्यक्तिगत गाठीभेटी, संमेलन, आजी विद्यार्थी समन्वय , ब्लड डोनर क्लब, आरोग्य शिबिरे, गोगटे कॉलेजमधील आजी विद्यार्थ्यांना व्यवसाय मार्गदर्शन , असे अनेक कार्यक्रम वर्षभर सुरू असतात .
कोरोना व्हायरस मुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटाला थोडं देण्यासाठी 1995 चे रत्नागिरीतील तसेच पुणे ,मुंबई, चिपळूण, गुहागर ,कोल्हापूर अश्या सर्वत्र राहणाऱ्या माजी विद्यार्थ्यांनी आपल्या सामाजिक बांधिलकी म्हणून सढळहस्ते मदत केली आहे.
विशेष म्हणजे सर्वच राजकीय पक्षातील प्रमुख पदाधिकारी आणि सामाजिक संघटनांचे प्रमुख या 95 फॅमिली मध्ये आहेत परंतु स्वतःच्या पक्षातून तसेच सामाजिक संघटना म्हणून मदत कार्य करतच आहेत पण GJC 95 फॅमिली मैत्तीची संघटना म्हणून सुद्धा या मदत कार्यात सक्रिय आहे. या स्तुत्य उपक्रमाबद्दल सर्वत्र समाधान आणि कौतुक केले जात आहे.अशा पद्धतीच एव्हढं मोठं काम होणारी ही किंबहुना एकमेव विद्यार्थी माजी संघटना आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button