
राजापूर तालुक्यातील परदेशातुन आलेल्याचा क्वारंटाईनचा कालावधी संपल्याने त्यांची क्वारंटाईन मधून मुक्तता
बाहेरून आलेल्या व्यक्तींचे संस्थात्मक विलिगीकरण पाच दिवसांऐवजी आता चौदा दिवस करण्यात आल्याने राजापूर आरोग्य विभागाकडून शहरातील येथील मंगल कार्यालय संस्थात्मक विलिगीकरण कक्षासाठी आरक्षित करण्यात आले आहे. राजापूर तालुक्यात आता संस्थात्मक विलिगीकरण कक्षात ४० जण तर होम क्वारंटाईनची संख्या ३१३ इतकी आहे.
परदेशातुल आलेल्या ५७ पैकी ५६ जणांचा २८ दिवसांचा क्वारंटाईनचा कालावधी संपल्याने ते क्वारंटाईनमधून मुक्त झाले आहेत. तशी माहिती तालुका आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.
www.konkantoday.com