
गाडी पंक्चर केल्याच्या गैरसमजातून चिपळुणात प्रौढाचा तरूणावर सुर्याने हल्ला
गाडी पंक्चर केली, असा समज करून घेत शिवीगाळ करत एका प्रौढाने तरूणावर मासे कापण्याच्या सुर्याने हल्ला केल्याची घटना रविवारी चिपळूण शहरातील बहादूरशेख नाका येथे घडली. या प्रकरणी हल्ला करणार्या प्रौढावर चिपळूण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुजफ्फर मुजीबर रहेमान पठाण (५६, बहादूरशेख नाका) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. या बाबतची फिर्याद राकेश रमेश चव्हाण (३७, दळवटणे) यांनी दिली. राकेश चव्हाण हा गणी प्लाझा बिल्डींगमधील स्वतःच्या सलूनमध्ये काम करतो राकेश आपली गाडी पंचर करतो अशा समजूतीतून ही घटना घडली आहे
www.konkantoday.com