
व्हॉट्सऍपने फॉरवर्ड मेसेज पाठवण्यावर निर्बंध आणले
कोरोना संसर्गाच्या या काळात सोशल मीडियावरही अफवा आणि खोट्या बातम्यांचं पीक आलं आहे. अशा अफवा आणि खोट्या बातम्या रोखण्यासाठी आता व्हॉट्सऍपने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. व्हॉट्सऍपने फॉरवर्ड मेसेज पाठवण्यावर निर्बंध आणले आहेत.आता कोणत्याही व्यक्तीला व्हायरल होत असलेले मेसेज, मीम, फोटो किंवा व्हिडिओ एकापेक्षा जास्त लोकांना फॉरवर्ड करता येणार नाहीत. कोरोना व्हायरसबाबत खऱ्या माहितीऐवजी खोटी माहिती मिळाली तर लोकं प्रभावित होऊ शकतात, असं कंपनीने सांगितलं आहे.अजून त्याची अमंलबजावणी झाली नसली तरी केव्हाही हाेऊ शकणार आहे
www.konkantoday.com