
अखेर केंद्रीय पोलीस दलाच्या दहा तुकड्या महाराष्ट्रात दाखल
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव, लॉकडाऊनचा काळ आणि पोलीस यंत्रणेवर या सर्व परिस्थितीमुळे येणारा सातत्यपूर्ण ताण पाहता अखेर केंद्रीय पोलीस दलाच्या दहा तुकड्या महाराष्ट्राच दाखल करण्यात आल्या आहेत. ज्या सोमवारीच राज्यातील विविध ठिकाणी सेवेत रुजू होणार आहेत.
राज्यात दाखल होत असणाऱ्या या तुकड्यांमध्ये ५ रॅपिड अॅक्शन फोर्स, ३ तुकड्या CISF आणि CRPF च्या २ तुकड्या दाखल करण्यात आल्या आहेत.
दाखल करण्यात आलेल्या एका तुकडीत १०० जवान आहेत. राज्यातील एकंदर परिस्थिती पाहता राज्य शासनाने एकूण २० तुकड्या मागवल्या होत्या, त्यातील १० तुकड्या सद्यस्थितीला केंद्राने पाठवल्याची माहिती समोर आली आहे.
www.konkantoday.com