रत्नागिरी येथील भाटये पुलावरून काल रात्री तीनच्या दरम्यान एका वृद्धाने आत्महत्या केली असल्याची माहिती मिळत आहे.या वृद्धाचा आजही शोध सुरू आहे.इसमाचे नाव मुरकर असल्याची माहिती उपलब्ध होत आहे.सदरच्या इसमाची दुचाकी पुलाच्या ठिकाणी आढळली.दुचाकीच्या डिकीत मोबाईल आढळून आला यामुळे या इसमाने पुलावरून उडी मारून आत्महत्या केली असावी असा संशय आहे.हा प्रकार घडल्यामुळे भाटये पुलावर गर्दी झाली होती परंतु या इसमाचा अद्यापही शोध लागलेला नाही त्यादृष्टीने त्याचा शोध सुरू आहे
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here