
रत्नागिरी शहरातील जेलनाका येथील सिग्नल यंत्रणा परत सुरू
रत्नागिरी शहरातील जेलनाका येथे अत्याधुनिक अशी बसवलेली सिग्नल यंत्रणा गेले काही दिवस बंद होती. निवडणुका व त्या अनुषंगाने निघणार्या मिरवणुका आदी कारणामुळे या ठिकाणी सिग्नल यंत्रणा सुरू ठेवल्यास वाहतुकीची कोंडी होण्याची शक्यता होती. त्यामुळे ही सिग्नल यंत्रणा बरेच दिवस बंद ठेवण्यात आली होती. आता लोकसभा निवडणुकीचे मतदान पार पाडल्यामुळे ही यंत्रणा पुन्हा सुरू करण्यात आली आहे. www.konkantoday.com