
जिल्हा कॉंग्रेसने जाहीर केली जम्बो कार्यकारिणी
रत्नागिरी जिल्हा कॉंग्रेसचे जिल्हा अध्यक्ष ऍड. विजय भोसले यांनी विस्तारित जम्बो जिल्हा कार्यकारिणी जाहीर केली आहे. अशोक जाधव, यशवंत बाणे, सुधीर दाभोळकर, रमेश शहा, विलास शेळके, बरकत काझी, रमाकांत बेलवलकर, रतनशेठ पवार, सुरेश राऊत, चंद्रकांत परवडी, मेहबूब पालेकर, अनंत जाधव, जयवंत दुदवडकर, इकबाल घारे, बिपीन गुप्ता, दिगंबर कीर यांची उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. संतोष मांढरे यांची कोषाध्यक्ष, सुरेश कातकर, भरत लब्धे, संतोष शिर्के, संजय मयेकर, किशोर नारकर, श्रीकृष्ण हेगिष्टे, नितीन हांदे, अस्मिता केंद्रे, गणपत खामकर, राजेश पत्याने, दिलीप पेंढारी, भरत खेडेकर, बंडू सावंत, महेश सप्रे, अशफाक काद्री, चंद्रकांत जाधव, मनोहर सप्रे यांची सरचिटणीस म्हणून निवड करण्यात आली आहे. तर कैसर देसाई, राजेंद्र सौंडकर, सुनिता डोंगरे, राजेश राणे, जुनेद मुल्ला, मधुकर शिंदे, प्रकाश मांडवलकर, नंदकुमार थरवळ, रफीक मोडक, संदीप लवेकर, शहाजी पवार, नारायण भुरण, दिपक निवाते, राकेश चव्हाण, रामचंद्र कदम, शांताराम मादलेकर, शब्बीर भाटकर, बाळा करंजकर, नंदन गांगण, प्रितम पिलणकर यांची चिटणीस म्हणून निवड करण्यात आली आहे तर जिल्हा कार्यकारिणी सदस्य म्हणून किरण हेळेकर, अभिजित नार्वेकर, श्रीमती अंजली यादव, गुलजार पुरवले, विनायक खडपे, अब्दुल्ला सोलकर यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. याशिवाय १३ जणांना सल्लागार म्हणून घेण्यात आले आहे तर कायम निमंत्रित म्हणून खा. हुसेन दलवाई, आ.भाई जगताप, आ. हुस्नबानु खलिफे, माजी जिल्हाध्यक्ष रमेश कीर, हरिष रोगे, सुजित झिमण आदींचा समावेश करण्यात आला आहे.
www.konkantoday.com