रिक्षाचालकाला मारहाण करून भाटे पुलावरून खाली टाकण्याचा प्रयत्न

रिक्षा व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातानंतर झालेल्या वादावादीतून रिक्षाचालकाला भाटे पुलावरून खाली फेकण्याचा प्रयत्न झाला हा प्रकार भाटे पुलावर घडला परेश शिवलकर हा रिक्षाचालक प्रवासी घेऊन जात असता भाटे पुलावर समोरून एक दुचाकी घेऊन आलेला स्वार मोबाइलवर बोलत गाडी चालवत असताना दोन्ही गाड्या एकमेकांवर आदळल्या या अपघातानंतर दुचाकीतून दारूच्या बाटल्या रस्त्यावर पडल्या रिक्षाचालकाने हा प्रकार मोबाइलमध्ये शूटिंग करण्याचा प्रयत्न केला त्यावरून वादावादी सुरू झाली दुचाकीस्वाराने फोन करून चार जणांना बोलवून घेतले तेथे आलेल्या चौघांनी रिक्षाचालकाला स्टीकने बेदम मारहाण केली हो त्याला धरून भाटे पुलावरून खाली टाकण्याचा प्रयत्न केला तसेच रिक्षाचीही मोडतोड केली दरम्यान घटना स्थळीजमलेल्या नागरिकांनी रिक्षाचालकांची सुटका केली रिक्षा चालकाला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून कला जबर मार बसला आहे रिक्षाचालकाला मारहाण करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांचा शोध सुरू आहे

Related Articles

Back to top button