
लायन्स क्लब ऑफ रत्नागिरीच्या झोन चेअरपर्सन श्रेया केळकर इंटरनॅशनल प्रेसिडंट लीडरशिप मेडलने सन्मानित
महाबळेश्वर येथे लायन्स क्लब ऑफ रत्नागिरीच्या झोन चेअरपर्सन श्रेया केळकर यांना इंटरनॅशनल प्रेसिडंट लीडरशिप मेडलने सन्मानित करण्यात आले तसेच इतिहासात प्रथमच झोन चेअरपर्सन श्रेया केळकर, अध्यक्षा शिल्पा पानवलकर, सचिव संजय पटवर्धन, खजिनदार श्रद्धा कुळकर्णी या चारही पदाधिकाऱ्यांची औरंगाबाद येथे ११ व १२ मे रोजी होणाऱ्या बहुप्रांतीय परिषदेसाठी निवड झाली.या वर्षी डिस्ट्रिक्ट ३२३४ डी १ ची प्रांतीय परिषद महाबळेश्वर येथे झाली. ८० पेक्षा जास्त क्लब या परिषदेमध्ये सहभागी झाले. ८१ क्लब आणि २७९६ सभासदांमधून लायन्स क्लब ऑफ रत्नागिरीच्या झोन चेअरमन श्रेया केळकर यांना सर्वोच्च इंटरनॅशनल प्रेसिडंट लीडरशिप मेडल देऊन गौरवण्यात आले. क्लब खजिनदार, सचिव, अध्यक्ष, झोन चेअरपर्सन, रिजन चेअरपर्सन, वेगवेगळ्या प्रोजेक्ट फाईल यांच्यामध्ये स्पर्धा झाल्या. २७९६ सभासदांमधून रत्नागिरी लायन्स क्लबने बाजी मारली. या व्यतिरिक्त श्रेया केळकर यांनी बनवलेली पर्मनंट प्रोजेक्ट फाईल आणि शबाना वास्ता यांची एलसीआयएफ फाईल, ऋचा पानवलकर यांनी बनवलेले स्क्रॅप बुक बहुप्रांतीय परिषदेसाठी निवड झाली. विशाल ढोकळे यांनी क्वीज कॉन्टेस्टमध्ये प्रथम क्रमांक पटकवला.www.konkantoday.com