
*ठाकरे गटाचे उपनेते आणि राज्याचे माजी समाज कल्याणमंत्री बबनराव घोलप यांनी आपल्या शिवसैनिक पदाचा राजीनामा दिला*
*ठाकरे गटाचे उपनेते आणि राज्याचे माजी समाज कल्याणमंत्री बबनराव घोलप यांनी आपल्या शिवसैनिक पदाचा राजीनामा दिला* _______________________बनराव घोलप यांनी ठाकरे गटाच्या उपनेते पदाचा राजीनामा दिला आहे. घोलप यांच्या राजीनाम्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. .ठाकरे गटाचे उपनेते आणि राज्याचे माजी समाज कल्याणमंत्री बबनराव घोलप यांनी आपल्या शिवसैनिक पदाचा राजीनामा दिला आहे. लवकरच ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.गेल्या काही दिवसांपासून घोलप यांच्या नाराजीच्या चर्चा सुरू होत्या. काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाने त्यांच्याकडून शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे संपर्क मंत्रिपद काढून घेतले होते. आज बबनराव घोलप यांनी आपल्या उपनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. बबनराव घोलप यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची भेटही घेतली होती. तेव्हापासून बबनराव घोलप हे शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकारणात सुरू होत्या. विशेष बाब म्हणजे, गेल्या महिन्यात नाशिकमध्ये झालेल्या ठाकरे गटाच्या अधिवेशनाला देखील घोलप उपस्थित नव्हते. उद्धव ठाकरे शिर्डीत असताना त्यांनी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर घोलप हे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा जोर धरू लागल्या. अखेर आज (गुरुवारी १५ फेब्रुवारी) बबनराव घोलप यांनी शिवसैनिकपदाचा राजीनामा दिला आहे.www.konkantoday.com