कोकण रेल्वेच्या गाडय़ा हळूहळू रुळावर,डबल डेकर पुन्हा कोकणवासीयांच्या सेवेत! ऑगस्टपासून कोकण रेल्वे मार्गावर धावणार

कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर बंद असलेल्या कोकण रेल्वेच्या अनेक गाड्या हळूहळू पूर्ववत करण्याचा कोकण रेल्वे महामंडळाचे प्रयत्न आहे
प्रवाशांसह पर्यटकांच्या पसंतीस उतरलेली वातानुकूलित डबल डेकर एक्स्प्रेस तब्बल सव्वा वर्षांपेक्षा अधिक काळ विश्रांतीनंतर पुन्हा कोकण रेल्वे मार्गावर धावणार आहे.
देशात कोरोना प्रादुर्भाव सुरु झाल्यानंतर गेल्या वर्षी गेल्या वर्षी २०मार्चपासून लॉकडाऊन लागू झाल्यांतर कोकण रेल्वे मार्गावर धावणारी डबल डेकर एक्स्प्रेस यार्डातच विसावली होती. आता हळुळहू कोकण रेल्वेच्या गाड्या पूर्ववत होऊ लागल्या असतानाच दिवसा तसेच रात्रीची धावणारी अशा डबल डेकरच्या दोन्ही सेवा २ ऑगस्टपासून पुन्हा सुरु केल्या जाणार आहेत.
या बाबत रेल्वेकडून प्राप्त माहितीनुसार दिवसा धावणारी डबल डेकर एक्स्प्रेस २ ऑगस्टपासून आवड्यातून धावणारी डबल डेकर (01085/01086) सोमवार तसेच बुधवारी लो. टिळक टर्मिनसहून पहाटे 5.33 वा. सुटेल तर मडगावहून ही गाडी 3 ऑगस्टपासून दर मंगळवार तसेच बुधवारी पहाटे 5 वा. मुंबईसाठी सुटणार आहे तर रात्रीच्या वेळी मुंबईहून सुटणारी साप्ताहिक डबल एक्स्प्रेस (01099/01100) ही मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनहून 7 ऑगस्टपासून दर शनिवारी रात्री 12 वा. 45 मिनिटांनी सुटणार असून परतीच्या प्रवासात ही गाडी मडगावहून 8 ऑगस्टपासून दुपारी 12.15 वाजता सुटणार आहे. ही डबल डेकर एक्स्प्रेस त्याच दिवशी रात्री 11 वा.45 मुंबईत लो. टिळक टर्मिनसला पोहचेल. कोकण रेल्वे मार्गावर धावणार्‍या दोन्ही डबल डेकर गाड्या या 12 एलएचबी वातानुकूलित कोचसह धावणार आहेत.
डबल डेकरचे थांबे
डबल डेकर गाडी ठाणे, पनवेल, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सावंतवाडी, थीवी स्थानकांवर थांबणार आहे तर नाईट डबल डेकर ठाणे, पनवेल, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सावंतवाडी, थीवीसह करमाळी स्थानकावरही थांबणार आहेत. गेल्या सव्वा वर्षापासून बंद असलेली डेकर एक्स्प्रेस पुन्हा कोकण रेल्वे मार्गावर धावणार असल्याने प्रवाशांना एक चांगली सुविधा परत उपलब्ध होणार आहे
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button