कणकवलीत महायुतीचा उमेदवार निवडून येणार ,आमदार प्रसाद लाड यांची गुगली
रत्नागिरी जिल्ह्यात भाजप बंडखोरांनी उमेदवारी मागे घेतल्याने भाजप सेना महायुती भक्कम झाली आहे असे असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवलीमध्ये भाजपच्या अधिकृत उमेदवार नीतेश राणे यांच्या विरोधात शिवसेनेने अधिकृत उमेदवार उभा केला आहे .कणकवलीत नेमके काय घडणार असा सवाल पत्रकारांनी आमदार प्रसाद लाड यांना विचारला त्यावेळी या ठिकाणी महायुतीचा उमेदवार विजयी होईल असे उत्तर देऊन गुगली टाकली. राज्यात भाजपा सेना यांची महायुती आहे यामुळे आमदार लाड यांच्या उत्तरात महायुतीचा नेमका कोणता उमेदवार विजयी होणार हा प्रश्न सर्वांना पडला आहे .
www.konkantoday.com
______
*पंचमी*
खवय्यांच्या आपुलकीचे,चविष्ट नाते पंचमीचे. . . . .
*चटकदार लसूण चटणी ॥ लज्जतदार शेंगदाणा चटणी*
सर्वत्र उपलब्ध
02352-221841
_______________________