मत्स्य विद्यापीठ कोकणातच राहणार व विद्यार्थ्यांच्या पदव्या देखील ग्राह्य धरणार; विधानसभेमध्ये विधेयक मंजूर; शिवसेना आमदारांना यश.

मुंबई ( प्रतिनिधी) आजपासून सुरू झालेल्या महाराष्ट्र सरकारच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिलाच दिवस कोकणवासीयांना भाग्याचा ठरला असून शिवसेना आमदार राजन साळवी आणि आमदार उदय सामंत ह्यांच्या यशाचा ठरला आहे. शिवसेना आमदारांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे आज विधानसभेमध्ये महाराष्ट्र कृषी विद्यापीठे कायदा, १९८३ आणि महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ कायदा, १९९८ ह्या दोन्ही कायद्यांमध्ये सुधारणा करण्याचे विधेयक राज्याचे कृषी राज्यमंत्री ना. सदाभाऊ खोत यांनी मांडले. नागपूर उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार महाराष्ट्र शासनाने दि. १२ जून २०१९ रोजी अध्यादेश काढून उपरोक्त कायद्यांच्या कलम ९ मध्ये सुधारणा केली होती. सदर अध्यादेश आज विधेयक स्वरूपात विधानसभेसमोर मांडण्यात आला.
सदर सुधारणेमुळे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने सन २००० पासून मा. राज्यपाल महोदयांच्या संमतीने प्रदान केलेल्या पदव्या विधिग्राह्य धरण्यात येतील.तसेच मत्स्यशास्त्र ह्या विषयात कोकण कृषी विद्यापीठाला मत्स्यशास्त्र पदवी प्रदान करण्याचे अधिकार देण्यात आलेले आहेत. तसेच कोकण कृषी विद्यापीठांतर्गत सध्या कार्यरत असलेले मत्स्य महाविद्यालय, शिरगाव, रत्नागिरी आणि इतर सहा संशोधन संस्था याच विद्यापीठांतर्गत राहतील अशी सुधारणा देखील केली गेली आहे. पुढील सहा महिन्यांमध्ये मा. राज्यपाल महोदयांच्या आदेशाने सदर विधेयकाचे कायद्यात रूपांतर होणार असून सदर कायदा लागू होणार आहे, त्यामुळे कोकणवासीयांचा हा प्रश्न कायमचा सुटला आहे. सदर विधेयक विधानसभेमध्ये मांडल्याबद्दल विधिमंडळातील शिवसेना कोकण पक्षप्रतोद व राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार राजनजी साळवी यांनी राज्याचे कृषी राज्यमंत्री ना. सदाभाऊ खोत यांचे पुष्पगुच्छ देऊन आभार मानले. त्यासमयी आदिनाथ कपोले उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button