आलिशान क्रूझ जहाज रत्नागिरीमध्ये दाखल

0
169

जलेश क्रूझचे कर्णिका या आलिशान क्रूझ जहाजाची मुंबई – गणपतीपुळे(जयगड)- मुंबई ही सेवा प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आली आहे.हे जहाज मुंबई येथून सुटून गणपतीपुळे(जयगड)येथे येऊन पुन्हा मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहे.ही सफर तीन दिवस दोन रात्र अशी असणार आहे.हे आलिशान क्रूझ जहाज आज गुरुवार सकाळी ८ वाजता मुंबई येथून रत्नागिरी जयगड येथील आंग्रे पोर्ट येथे दाखल झाले.आज सायंकाळी ६ वाजता हे जहाज मुंबईच्या दिशेने रवाना होईल.या जहाजामध्ये एकूण चौदा डेक आहेत.प्रवाशांकरिता या जहाजामध्ये रेस्टॉरंट,स्विमिंग पूल, हॉटेल रुम्स, जिमसारख्या सुविधा आहेत.तसेच लहान मुलांसाठी खेळण्याच्या सुविधा देखील उपलब्ध आहेत.एकूणच काय तर फायुस्टार हॉटेलचा अनुभव तुम्हाला या अलिशान क्रूझच्या मार्फत घेता येणार आहे.पर्यटकांकडून या जहाजाला चांगला प्रतिसाद मिळाला तर हे जहाज कायमस्वरूपी या मार्गावर सुरू ठेवण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे.अशा प्रकारच्या जहाजाच्या माध्यमातून कोकणातील पर्यटनाला चालना मिळणार हे मात्र नक्की.या जहाजाविषयी अधिक माहितीसाठी आपण या https://jaleshcruises.com संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
www.konkantoday.com
________________________

*माई हुंडाई रत्नागिरीमधून सेंट्रो सीएनजी कार खरेदी करा आणि पेट्रोल दरवाढीची चिंता सोडा संपर्क-9922949540,9206202122*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here