रत्नागिरी शहरात ९७ बांधकामे धोकादायक

रत्नागिरी ः रत्नागिरी शहरातील परटवणे येेथे अशोकनगर येथील बौद्धविहारच्या बाजूला असलेली व्यायामशाळेची इमारत नुकतीच जमीनदोस्त झाली आहे. या आधी धनजीनाका येथीलही एक जीर्ण इमारत कोसळली होती. रत्नागिरी जिल्ह्यात नगरपरिषदेने केलेल्या सर्व्हेप्रमाणे एकूण ९७ धोकादायक इमारती आहेत. यातील काही इमारतींमध्ये लोकही रहात आहेत. या इमारती धोकादायक असल्याचे नगर परिषदेने जाहीर केले असले तरी या इमारतींना केवळ नोटीसा देण्याचे काम नगरपरिषदेने केले आहे. याबाबत नगर परिषदेने कारवाई करण्याचा प्रयत्न केल्यास संबंधित इमारतीचे मालक न्यायालयात जातात त्यामुळे नगर परिषदेला कोणतीही कारवाई करता येत नाही. केवळ नोटीसा देण्याचे काम नगर परिषदेला करावे लागत आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button