आदर्श आचारसंहिता पाळावी -डॉ. विकास सूर्यवंशी
रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून सहा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत .या मतदारसंघात बहुरंगी लढत होणार आहे मान्यता प्राप्त नसलेल्या पक्षांना चिन्ह वाटप करण्यात आले असल्याची माहिती रत्नागिरीचे प्रांत व निवडणूक अधिकारी डॉ. विकास सूर्यवंशी यानी दिली. निवडणुकीच्या दरम्यान सर्वानी आचारसंहितेचे पालन करावे. आचारसंहिते भंगावर निवडणूक विभागाची करडी नजर असल्याचेही त्यांनी सांगितले. या विधानसभा मतदारसंघात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला एकही उमेदवार नाही .
www.konkantoday.com