
सोमवारी महाराष्ट्रात करोनाच्या ओमायक्रॉन प्रकाराचे दोन नवीन रुग्ण आढळले
सोमवारी महाराष्ट्रात करोनाच्या ओमायक्रॉन प्रकाराचे दोन नवीन रुग्ण आढळून आले आहेत. यासह राज्यातील एकूण रुग्णांची संख्या झपाट्याने वाढून २० झाली आहे. ओमायक्रॉन प्रकाराचे एकूण ४० रुग्ण देशभरात आहेत.त्यातील २० रुग्ण हे एकट्या महाराष्ट्रात आहे. त्यामुळे ओमायक्रॉन व्हेरिएंटची देशातील निम्मी प्रकरणे महाराष्ट्रातच आहेत. अशा परिस्थितीत महाराष्ट्रात आता ओमायक्रॉनचे संकट वाढणार का, अशी भीती व्यक्त होत आहे. याआधी, दुसरी लाट निर्माण करणाऱ्या डेल्टा व्हेरियंटच्या जवळपास निम्म्या केसेस बऱ्याच काळापासून महाराष्ट्रातून येत होत्या. तर महाराष्ट्रात करोना रुग्णांचे मोठ्या प्रमाणात मृत्यू झाले आहेत.
www.konkantoday.com