आयुषचे भव्य केंद्र दांडेआडोम येथे उभे राहणार
आयुर्वेद होमियोपथी उपचारांना आता रुग्णांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. सध्या रत्नागिरी येथील शासकीय रुग्णालयात आयुषचा विभाग सुरू आहे.रत्नागिरी जवळील दांडेआडाेम येथे आता आयुष्यचे भव्य रुग्णालय उभे केले जाणार आहे. दांडेआडोम येतील १० एकर जागेत हे केंद्र उभे करण्यासाठी जिल्हाधिकार्यांकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे जागेचा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर केंद्र शासनाच्या आयुष विभागामार्फत येथे रुग्णालय उभे करण्यात येणार आहे. निसर्गाच्या सानिध्यात उभे राहणाऱ्या आयुष्य भव्य रुग्णालयात पुरुष व स्रियांसाठी पंचकर्म विभाग, योगा हॉल तसेच रुग्णांना, दाखल करून त्यांच्यावर उपचारही केले जाणे शक्य आहे अनेक व्याधींमध्ये आयुर्वेद ,युनानी व होमिओपॅथिक औषधांचा उपयोग होत असल्याने रत्नागिरीत असलेल्या आयुषच्या विभागात गेल्या वर्षभरात हजारो रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत.
www.konkantoday.com
________________________
*माई हुंडाई रत्नागिरीमधून सेंट्रो सीएनजी कार खरेदी करा आणि पेट्रोल दरवाढीची चिंता सोडा संपर्क-9922949540,9206202122*