आणि जिल्हा न्यायालयाच्या आवारातील जुन्या वृक्षाला परत जीवदान मिळाले. . .

वादळामुळे व अन्य कारणामुळे वृक्ष कोसळून पडलेकी आपण त्याची लगेचच विलेवाट लावतो. परंतु कोसळलेला वृक्ष परत उभा केला तर एक वृक्ष आपण वाचवू शकतो याचे उत्तम उदाहरण रत्नागिरीत घडले आहे. रत्नागिरी न्यायालयाच्या आवारात असलेल्या १५० वर्षांपूर्वीचा पिंपळाचा वृक्ष कोसळला. कोसळलेला वृक्ष न्यायालयाचा अनेक वर्षांचा साक्षीदार होता . या वृक्षाचे परत पुनर्रोपण करता येईल का असा विचार सुरू झाला. जिल्हा न्यायाधीश जोशी साहेब व त्यांच्या सहकाऱ्यांनी याबाबत पुढाकार घेतला. बार असोशियनच्या सदस्यांनी ही कल्पना उचलून धरली. त्यानंतर या वृक्षांचे पुनर्रोपण करण्यासाठी जागा निवडण्यात आली.त्यासाठी मोठा खड्डा खणण्यात आला या कामी सार्वजनिक बांधकाम विभाग, जीवन प्राधिकरण, फिनोलेक्स आदिनी सहकार्य केले.मुळ वृक्षाच्या काही फांद्या तोडून हा वृक्ष परत एकदा क्रेनच्या साह्याने उचलून त्याच्या पुनर्रोपणाला सुरुवात झाली. मोठ्या क्रेनच्या साहाय्यानेही हा वृक्ष उचलता येत नव्हता तरी देखील प्रयत्न सुरूच होते. न्यायालयाच्या आवारात असलेल्या महापुरुषांच्या साक्षीने परत एकदा क्रेनच्या सहाय्याने हा वृक्ष उचलण्याचा प्रयत्न झाला आणि तो यशस्वी झाला. सर्वांनी सुरू केलेले वृक्ष पुनर्रोपणाचे काम शनिवारी रात्री सुरू झाले आणि तीस तासांच्या मेहनतीने अनेक कर्मचाऱ्यांच्या मदतीने व यंत्रणेच्या सहकार्याने वृक्षारोपणाचे काम पूर्ण झाले. विशेष म्हणजे न्यायाधीश साहेब व अधिकारी वर्ग पहाटेपर्यंत उपस्थित होते. १५०वर्षांचा साक्षीदार असलेला हा वृक्ष परत एकदा उभा केल्याने सर्वांच्या चेहऱ्यावर समाधान होते. आता या वृक्षाला जीवदान मिळाल्याने हा वृक्ष आता परत एकदा न्यायालयाचा साक्षीदार राहणार आहे. न्यायालयाच्या इतिहासात प्रथमच असा पर्यावरणपूरक उपक्रम राबवला गेला आहे.वृक्ष सहजगत्या तोडता येतात परंतु वृक्ष टिकवण्याचा क्षण किती आनंददायी असतो या उपक्रमामुळे सिद्ध झाले.यामुळे या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button