तालुका अध्यक्षाच्या निवडीवरून भाजपमध्ये पडले गट- तट
रत्नागिरी जिल्ह्याचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष दीपक पटवर्धन यांनी आज तालुका अध्यक्ष म्हणून सुशांत चवंडे यांची नेमणूक केली तसे लेखी पत्रही त्यांना दिले मात्र यावरून भाजपमध्ये आता गटातटाचे राजकारण सुरू झाले आहे.तालुक्यातील भाजपच्या बाळ माने गटातील लोकांनी एकत्र येऊन या नेमणुकीला विरोध केला आहे.या बैठकीला बाळ माने व त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आता माने गट तालुका अध्यक्ष पदासाठी कोणाचे नाव सुचवणार व त्याला जिल्हा अध्यक्ष मान्यता देणार की नाही हे लवकरच स्पष्ट होईल मात्र शिस्तप्रिय असलेल्या भाजपमध्ये देखील आता नेमणुकीच्या निमित्याने तट -गट दिसू लागले आहेत .
www.konkantoday.com