
कोकण रेल्वेचा क्रोसिंग रेल्वे स्थानक प्रकल्प व रोहा ते वीर या मार्गाचे दुपदरीकर अंतिम टप्प्यात
कोकण रेल्वे मार्गावरील प्रवास आता लवकरच आणखी सुखकर व वेगाने होणार आहे सध्या या मार्गावरून प्रवास करताना अनेकवेळा क्रॉसिंगसाठी थांबावे लागल्याने प्रवासाचा वेळ वाढत होता
मात्र आता कोकण रेल्वेवरील प्रवास येत्या चार महिन्यानंतर वेगवान तसेच विनाअडथळा होणार आहे. रोहा ते वीर या मार्गाचे दुपदरीकरण येत्या चार महिन्यात पूर्ण होणार आहे. याशिवाय महत्वाकांक्षी असलेला ‘क्रॉसिंग स्थानक’ प्रकल्पही पूर्ण झाला असून कोकण मार्गावरील प्रवास सुरळीत होईल, अशी माहिती कोकण रेल्वेकडून देण्यात आली.
कोकण रेल्वेवरुन प्रत्यक्षात कोकण व त्यामार्गे जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे. याशिवाय मालवाहतुकही मोठय़ा प्रमाणात होते. सध्या दोनच मार्ग असल्याने गर्दीच्या काळात अधिक संख्येने गाडय़ा सोडल्यास कोकण मार्गावरील वाहतुक कोलमडते.रोहा ते ठोकू र असे ७०० किलोमीटर मार्गाचे दुपदरीकरण करण्याचा निर्णय कोकण रेल्वेने घेतला होता. परंतु अनेक अडचणी पाहता रोहा ते वीर या ४६ किलोमीटरचे काम पूर्ण करण्याचे काम हाती घेतले. गेल्या तीन वर्षांपासून सुरु असलेल्या या कामाला अंतिम स्वरुप दिले जात आहे. जवळपास ९५ टक्के काम पूर्ण झाले असून ऊर्वरित काम तीन ते चार महिन्यात पूर्ण होईल, असा विश्वास कोकण रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी एल.के .वर्मा यांनी व्यक्त केला. त्यामुळे रेल्वेगाडय़ांची क्षमता वाढेल. शिवाय वेळापत्रकही सुरळीत होईल. या प्रकल्पाबरोबरच एकमेकांना रुळ ज्या ठिकाणी छेदतात (क्राॅस)अशा ठिकाणी क्र ॉसिंग स्थानक प्रकल्पाचे कामही पूर्ण झाल्याचे सांगितले. या प्रकल्पांतर्गत आठ नवीन स्थानके सेवेत येत आहेत. डिसेंबर २०१९ मध्ये हे दोन्ही प्रकल्प पूर्ण होणार होते. परंतु तांत्रिक कारणे, करोना, टाळेबंदीमुळे प्रकल्प कामे रेंगाळली होती. या प्रकल्पाचा खर्च २०२ कोटी रुपये आहे. यामध्ये रुळांच्या जोडणीपासून बरीच कामे करण्यात आली.
www.konkantoday.com
