
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधात लढा अधिक तीव्र करणार
लोटे औद्योगिक वसाहतीतील लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनी विरोधातील आंदोलन हे पक्षविरहित राहील याची दक्षता सर्वांनी घ्यायची असल्याने कॉंग्रेसचे माजी खासदार हुसेन दलवाई यांनी यापूर्वीच सर्वांना बजावलेले आहे. आता कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनी या आंदोलनात पक्षीय भूमिका मांडली असल्याने त्यांना यापुढील आंदोलनात सहभागी न करण्याचा निर्णय शुक्रवारी येथे झालेल्या बैठकीत सर्वानुमते घेण्यात आला. त्याचबरोबर लोटे परिसरात गाव भेट दौरे आयोजित करत पुढील लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार करण्यात आला.
या कंपनीविरोधात मजी खासदार दलवाइं यांच्या नेतृत्वाखाली यापूर्वीच मोर्चा काढून निदर्शने करण्यात आल्यानंतर त्याची दखल राज्यस्तरापर्यंत घेण्यात आली. त्यामुळे आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी बैठक पार पडी. बैठकीचे संयोजक भरत लब्धे, ऍड. संकेत घाग, सुमती जांभेकर, राजेंद्र आंब्रे, उदय घाग, अशोक जाधव, अशोक भुस्कुटे, पंजक दळवी, राम रेडीज, शाहनवाज शहा, सफा गोठे, निर्मला जाधव, वीणा जावकर, हुसेन ठाकूर, टी. डी. पवार, रणजित घाग, दिलीप घाग उपस्थित होते.www.konkantoday.com




