येत्या दोन दिवसात युतीची घोषणा होणार
लोकसभा निवडणुकीवेळीच विधानसभेचा फॉर्म्युला ठरला आहे. विधानसभा जागापाटपाचा निर्णय लवकरच कळवू. १३५-१३५ फॉर्म्युला फक्त मीडियाने पसरवला. दोन दिवसांत युतीची घोषणा करु, अशी माहिती शिवसेना प्रमुख उध्दव ठकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. मागील ५ वर्षात सेनेने सरकारला धोका दिलेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. विकासकामांना आम्ही कायम पाठिंबा दिला. तो सरकारला तर दिलाच पण जनतेच्या विकासालाही पाठिंबा दिला.
www.konkantoday.com