आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पाच प्रांतांसाठी काँग्रेसने प्रभारी नियुक्त केले
नवी दिल्ली : महाराष्ट्रीतील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने पाच प्रांतासाठी प्रभारींची नियुक्ती केली आहे.मुकुल वासनिक यांची विदर्भ प्रांतासाठी तर अविनाश पांडे यांची मुंबई प्रांत आणि निवडणूक नियंत्रण कक्षाचे, पश्चिम आणि कोकण प्रांतासाठी रजनी पाटील, आर. सी. खुंतिया यांची उत्तर महाराष्ट्रासाठी तर राजीव सातव यांची मराठवाडा प्रांताचे प्रभारी म्हणून नियुक्ती झाल्याचे अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी गुरुवारी पत्रकाद्वारे जाहीर केले.