रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अधिकारी आचल गोयल यांनी १९७ शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या करण्याचे आदेश काढले आहेत.मात्र असे आदेश करताना त्यांनी जिल्हा परिषद अध्यक्षांसह लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतल नसल्याचा आरोप जिल्हा परिषदेच्या पदाधिकार्‍यांनी केला असून त्यामुळे हे पदाधिकारी आक्रमक झाले आहेत.आज होणारे शिक्षकांचे समुपदेशन उधळून लावण्याचा इशारा शिवसेनेने दिला आहे. यामुळे शिक्षक बदल्यावरून प्रशासनाविरुद्ध लोकप्रतिनिधी असा सामना रंगला असून शिक्षकांचे समुपदेशन उधळून लावण्याचा इशारा शिवसेनेने दिल्यानंतर जिल्हा परिषद प्रशासनाने खबरदारी म्हणून पोलीस बंदोबस्त मागविला आहे. जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांमध्ये शिक्षकांच्या शेकडो जागा रिक्त असतानाच मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी १९७शिक्षकांच्या बदल्या केल्याने शिक्षकांच्या रिक्त पदात वाढ झाली असल्याचे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.हा आदेश काढताना सीईओंनी लोकप्रतिधींना विश्वासात घेतले नाही. यामुळे जी.प अध्यक्षांनी सीईओंना बदल्या न करण्याच्या सूचना केल्या होत्या. परंतु त्याची दखल सीआेनी घेतली नाही व बदल्यांच्या आदेशावर सह्या केल्या यामुळे शिवसेना लोकप्रतिनिधी संतप्त झाले आहेत.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here