
अमोल मिटकरी यांच्या गाडीची तोडफोड करणाऱ्या मनसे कार्यकर्त्याचा मृत्यू
अमोल मिटकरी यांच्या गाडीची तोडअमोल मिटकरी यांच्या गाडीची तोडफोड करणाऱ्या मनसे कार्यकर्त्याचा मृत्यूफोड करणाऱ्या मनसे कार्यकर्त्याचा मृत्यू झाला आहे. 24 वर्षांचा मनसे कार्यकर्ता जय मालोकर याचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं आहे.आंदोलनानंतर त्याला हृदयविकाराचा धक्का आला यानंतर त्याला ताबडतोब खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र रुग्णालयातच त्याची प्राणज्योत मालवली आहे. जय मालोकरच्या अचानक जाण्याने मनसे कार्यकर्त्यांमध्ये शोककळा पसरली आहे.पुणे दौऱ्यावर असताना राज ठाकरे यांनी पुण्याच्या पुरावरून अजित पवारांवर निशाणा साधला होता, यानंतर अमोल मिटकरी यांनी राज ठाकरेंचा उल्लेख सुपारीबाज असा केला. यानंतर मनसे आणि अमोल मिटकरी यांच्यातला वाद उफाळून आला. अकोल्यातील शासकीय विश्रामगृहात पार्क करण्यात आलेल्या अमोल मिटकरींच्या कारला मनसे कार्यकर्त्यांनी लक्ष्य केलं. झाडाची कुंडी आणि मोठे दगड टाकत अमोल मिटकरींच्या कारची मनसे कार्यकर्त्यांनी तोडफोड केली, यात मिटकरींच्या कारचं नुकसान झालं.