नवी दिल्ली : ज्येष्ठ वकील राम जेठमलानी यांचं आज सकाळी वयाच्या 95 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झालं आहे. दिल्लीतल्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
देशातील नामवंत वकील आणि कायद्याचे अभ्यासक अशी ओळख असलेले राम जेठमलानी गेल्या दोन आठवड्यांपासून आजारी होते. पाकिस्तानच्या सिंध प्रांतात त्यांचा जन्म झाला होता. फाळणीनंतर ते भारतात आले होते. आज सकाळी वयाच्या 95 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. 2017 मध्ये जेठमलानी यांनी वकिलीतून निवृत्ती घेतली होती. देशातील अनेक हाय प्रोफाईल खटले लढवण्याचं काम जेठमलानी यांनी केलं आहे.
वाजपेयींच्या मंत्रीमंडळात केंद्रीय कायदेमंत्री म्हणुनही त्यांनी काम पाहिलं होतं. नंतरच्या काळात भाजपसोबतचे संबंध बिघडल्यानंतर त्यांनी लालु प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाची वाट धरली. आरजेडीकडून ते राज्यसभेत गेले होते.
वयाच्या 18 व्या वर्षी राम जेठमलानी यांनी वकीलीची पदवी मिळवली होती. अनेक नावाजलेल्या खटल्यांमध्ये त्यांनी आरोपींचे वकील म्हणुन काम पाहिलेले आहे. देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांचा खटला जेठमलानी यांनी लढवला होता. संसदेवरील दहशतवादी हल्ल्यातील आरोपी अफजल गुरु याची फाशी रोखण्यासाठीचा खटला देखील त्यांनी लढवला होता. 26/11 च्या मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाब याचे दखील वकीलपत्र जेठमलानी यांनी घेतले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here