
श्री महापुरुष पोलिस संघ स्व. उमेश शेट्ये स्मृती चषकाचा मानकरी
रत्नागिरी : श्री महापुरुष मित्रमंडळ आणि श्री महापुरुष क्रीडा मंडळ, कोकणनगर आयोजित केतन शेट्ये पुरस्कृत कार्यसम्राट माजी नगराध्यक्ष स्वर्गीय उमेश शेट्ये स्मृती कार्यसम्राट चषकाचा मानकरी श्री महापुरुष पोलिस संघ ठरला. रत्नदीप, मिरजोळे संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. क्रिकेट स्पर्धेतील विजेत्या संघास 22 हजार 222 रुपये व चषक, तर उपविजेत्या संघास 11 हजार 111 रूपये व चषक देऊन गौरविण्यात आले. याशिवाय सामनावीर, उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज, क्षेत्ररक्षक, मालिकावीर, षटकार किंग सारखे विविध आकर्षक चषक मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. शिवाय पंच, लाईनमन, ग्राऊंडमन यांचाही सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. पारितोषिक वितरण समारंभ छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सदस्य, उद्योजक किरण सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी युवासेनेचे उपजिल्हा युवाअधिकारी केतन शेट्ये, उद्योजक ओंकार मोरे, डॉ. वक्रतुंड शेटये, कौसल्या शेट्ये, उद्योजक पिंट्या साळवी आदी उपस्थित होते. कार्यक्रमावेळी ‘भंडारी श्री 2022’ या स्पर्धेतील ‘जिद्दी भंडारी’ हा किताब जिंकणार्या मंडळाचे सचिव सिद्धेश ऊर्फ दादू किड्ये याचा उद्योजक किरण सामंत यांचे सन्मान करण्यात आला. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी श्री महापुरूष मित्र मंडळ, क्रीडामंडळाच्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.