परदेशवारीला नेताे असे सांगून गंडा घालणाऱ्या आरोपीला अटक
संस्थेच्या माध्यमातून पर्यटनासाठी थायलंड येथे घेऊन जाताे असे आमिष दाखवून २ लाख ३० हजार घेऊन फसवणूक करणाऱ्या कृष्णाजी रंगनाथ जगदाळे राहणार चेंबूर मुंबई या संशयिताला पोलिसांनी अटक केली आहे.रत्नागिरी येथील राहणार्या मानसी गवंडे
या शिक्षिका असून त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. या पुरस्काराच्या माध्यमातून जगदाळे यांची ओळख झाली. जगदाळे याने आपण चालवत असलेल्या अकादमीच्या माध्यमातून तुम्हाला थायलंड येथे पर्यटनासाठी कुटुंबासह नेऊ असे सांगून त्यांच्या जवळून जवळजवळ अडीच लाख रुपयांची रक्कम घेतली. मात्र त्यानंतर त्यांना परदेश वारीला नेले नाही.याबाबत जगदाळे यांना विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली व पैसेही परत करण्यास नकार दिला.आपली फसवणूक झाल्याचे कळताच गवंडे यांनी शहर पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केले आहे.
www.konkantoday.com