
कुवारबाव पंचक्रोशी ब्राह्मण सभेमार्फतब्रह्मानंद ग्राहक पेठचे आयोजन
रत्नागिरी : कुवारबाव पंचक्रोशी ब्राह्मण सभेमार्फत दसरा- दीपावलीनिमित्त दि. 3, 4 आणि 5 ऑक्टोबर 2025 रोजी नाचणे येथील गोखले भवनात ब्रह्मानंद ग्राहक पेठेचे आयोजन करण्यात आले आहे.
या ग्राहक पेठेत खास दिवाळी सणानिमित्त साड्या, कुर्तीज, दागिने, इको फ्रेंडली आकाशकंदील, आकर्षक दिवे, साबण, विविध खाद्य पदार्थांची रेलचेल असणार आहे. त्यामुळे एकाच छताखाली दिवाळीची ही खरेदी ग्राहकांना करता येणार आहे. साळवी स्टॉप – नाचणे लिंक रोड येथील कुवारबाव पंचक्रोशी ब्राह्मण सभेच्या श्रीमान यशवंत हरी गोखले भवनात ग्राहक पेठेचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ११ ते रात्री ८ वाजेपर्यंत प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले असणार आहे. या ग्राहक पेठेला रत्नागिरीकरांनी अवश्य भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.




