राजे शिर्केंचा बालहट्ट पुरवण्यास कोकण दिंडी बांधील नाही
कोकण दिंडी समाजाचा प्रमुख म्हणून मी म्हणेल तेच करण्यात यावे असा बालहट्ट रूपेश महाराज राजेशिर्के यांनी धरला असून हा बालहट्ट पुरविण्यास आम्ही बांधील नाही असा खुलासा कोकण दिंडीचे वामनराव पवार यांनी केला आहे.न्यासाचा कारभार
स्वच्छ व पारदर्शक असल्याचा दावाही त्यांनी केला.
कोकण दिंडी समाज रत्नागिरी या न्यासाच्या विरोधात रूपेश महाराज राजे शिर्के यानी पत्रकार परिषद घेऊन काही आरोप केले होते. त्याचा खुलासा पवार यांनी केला.हा न्यास कै.पी के सावंत १९६८साली स्थापन करण्यास मदत केली आजही तो त्याच घटनेने चालत आहे. कोकणातील अनेक भाविक या न्यासाला जोडल्या असून तो कोणत्या समाजाच्या किंवा कोणत्या फडातील आहे हे आम्ही पाहत नाही असेही पवार यांनी सांगितले.
www.konkantoday.com