चिपळूण तालुक्यातील पेढे कोष्टेवाडी येथे लोटे येथे पाईपलाईन फुटल्याने अनेक घरात पाणी

चिपळूण तालुक्यातील पेढे कोष्टेवाडी येथे लोटे एमआयडीसीला पाणी पुरवठा करणारी जलवाहीनी फुटली. या घटनेत पाण्याच्या प्रचंड वेगाने परिसरातील घरांमध्ये पाणी घुसले. सहा घरांतील विविध उपकरणांचे सुमारे १५ लाखाचे नुकसान झाले आहे. महसूल विभागाकडून या घटनेचा पंचनामा करण्यात आला.
पेढे येथून लोटे येथील एमआयडीसीला जलवाहीनीच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जातो. दरम्यान मंगळवारी दुपारच्या सुमारास पेढे कोष्टेवाडी येथे ही जलवाहीनी फुटल्याची घटना घडली. पाण्याला प्रचंड वेग होता. त्यामुळे जलवाहीनीतील पाण्याच्या दाबामुळे परिसरातील सहा घरांत पाणी शिरले. काही घरांची कौले फुटून घरात पाणी शिरले. पाण्यास प्रचंड दाब असल्याने ग्रामस्थांना तत्काळ काहीच उपाययोजना करता येत नव्हत्या. हे पाणी घरात शिरल्याने विद्युत उपकरणांसह विविध साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button