
कॅफे कॉफी डेचे संस्थापक व्ही. जी. सिद्धार्थ यांचा मृतदेह सापडला
बंगळुरु : देशातील सर्वात प्रसिद्ध कॉफी रेस्टॉरंट कॅफे कॉफी डे (Cafe Coffee Day) चे संस्थापक व्ही. जी. सिद्धार्थ (VG Siddhartha) यांचा मृतदेह नेत्रावती नदीत सापडला आहे. सोमवारी संध्याकाळपासून सिद्धार्थ बेपत्ता होते. सिद्धार्थ यांनी आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता. त्यानुसार नेत्रावती नदीत पोलिसांनी शोध मोहित सुरु केली होती.
सिद्धार्थ यांच्या ड्रायव्हरने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी संध्याकाळी 6 वाजल्याच्या सुमारास सिद्धार्थ नदीजवळ गाडीतून उतरले. त्यानतंर त्यांनी ड्रायव्हरला मी लगेचच येतो असे सांगितले. यानंतर जवळपास अर्धा तास ड्रायव्हरने सिद्धार्थ यांची वाट पाहिली.