*दिव्यांगांसाठी शासनाची स्वावलंबी योजना ताबडतोब राबवावी -शौकत मुकादम*

_दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने हरित उर्जेवर चालणार्‍या पर्यावरण स्नेही फिरत्या वाहनावरील दुकान, मोबाईल शॉपी, ऑनलाईन व्हेईकल, ऑटोरीक्षा आणि भाजी व्यवसाय मोफत उपलब्ध करून देण्याचे शासनाने जाहीर केले आहे. व तशा पद्धतीचे दिव्यांग व्यक्तीकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आल्यानुसार बर्‍याचशा दिव्यांग व्यक्तींनी ऑनलाईन अर्ज केलेले आहेत. परंतु ज्या दिव्यांगांनी ऑनलाईन अर्ज केलेले आहेत व ते शासनाच्या निकषामध्ये बसत आहेत त्या व्यक्तींना हेलपाटे मारायला न लावता त्यांना तातडीने सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी चिपळूणचे माजी सभापती तसेच पर्यावरणप्रेमी शौकतभाई मुकादम यांनी केली आहे. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button