दिवा-रत्नागिरी मेमूसह एलटीटी-कुडाळ रेल्वे गाड्या यार्डात विसावल्या


गणेशोत्सवासाठी १३ सप्टेंबरपासून कोकण मार्गावर मार्गस्थ नियमितपणे चालवण्यात आलेल्या दिवा-रत्नागिरी अनारक्षित मेमू स्पेशलसह लोकमान्य टिळक टर्मिनस-कुडाळ अनारक्षित स्पेशलच्या ५६ फेर्‍यांना चाकरमान्यांना उदंड प्रतिसाद लाभला. दिवा-रत्नागिरी मेमू स्पेशलची अखेरची फेरी सोमवारी धावली. तर एलटीटी-कुडाळ स्पेशलच्या केवळ २ ऑक्टोबरच्या अखेरच्या फेर्‍या रद्द करण्यात आल्या. या दोन्ही स्पेशल सोमवारपासून यार्डात विसावल्या.
यापूर्वी गणेशोत्सवात कोकण मार्गावर दिवा-चिपळूण डेमू स्पेशलचा प्रयोग करण्यात आला होता. यंदा गणेशोत्सवासाठी कोकण मार्गावर प्रथमच दिवा र्रय घेत रेल्वेगाड्यांना होणारी गर्दीची तीव्रता कमी करण्याचा प्रयत्नही करण्यात आला. ०११५३/०११५४ क्रमांकाच्या दिवा-रत्नागिरी मेमू स्पेशलच्या चालवण्यात आलेल्या ४० फेर्‍यांना प्रवाशांचा भरभरून प्रतिसाद लाभला. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button