चिपळूण व खेड पूरग्रस्त भागाची जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्याकडून पाहणी
गेले दोन दिवस चिपळूण खेड भागाला मुसळधार पावसाने झोडपले असून शहर परिसरात पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती. याशिवाय परशुराम घाटात दरड कोसळल्याने वाहतूकही बंद झाली होती. त्यामुळे या भागातील जनजीवन विस्कळीत झाले होते. आज जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी चिपळूण परिसरातील पूरग्रस्त भागाची पाहणी केली तसेच परशुराम घाटात व खेड भागातही त्यांनी भेट देवून जनजीवन सुरळीत होण्यासाठी अधिकाऱयांना सूचना केल्या. खेड येथील भोस्ते घटाचीही जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी केली.
www.konkantoday.com