महिलेला खंडणीची धमकी देणार्‍या दोघाजणांविरूद्ध गुन्हा दाखल

0
323

रत्नागिरी ः फैमीद मुश्ताक काझी (रा. मजगांव रोड, रत्नागिरी) या महिलेला धमकी देवून ५० हजारांची खंडणी मागितल्याच्या आरोपावरून पोलिसांनी जाहीद मुकादम व हुजेल काझी (रा. मजगांव) या संशयितांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. सदरची महिला रिक्षेने मजगांवकडे जात असता कदमवाडी येथे वरील संशयितांनी दुचाकीवरून येवून महिलेची रिक्षा अडवली व महिलेला तिच्या पतीला ठार मारण्याची धमकी दिली व ५० हजार रुपयांची मागणी केली. त्यानंतरही मोबाईल फोन करून सदर महिलेला धमकी देण्यात येत होती. त्यामुळे या महिलेने पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर पोलिसांनी या दोघांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here