रत्नागिरी नगर परिषदेला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार प्राप्त
रत्नागिरी ः केंद्र शासनामार्फत स्वच्छ भारत अभियान अंतर्गत देशातील सर्व शहरांचे स्वच्छतेचे अनुशंगाने दरवर्षी सर्वेक्षण करण्यात येते. त्यानुसार केंद्र शासनाने केलेल्या स्वच्छ सर्वेक्षण २०१८ चे सर्वेक्षणात २६ वा क्रमांक व २०१९ चे सर्वेक्षणात २३ वा क्रमांक पटकावला आहे. शहराच्या स्वच्छतेच्या व पर्यायाने स्वच्छ सर्वेक्षणात केलेल्या या कामगिरीबद्दल आज २३ जुलै २०१९ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रत्नागिरी नगर परिषदेला मुंबई येथे पुरस्कार प्राप्त झाला.यावे मुख्याधिकारी अरविंद माळी,स्वच्छ सर्वेक्षणचे शेख साहेब,नगरसेवक बंटी कीर व अन्य लोक उपस्थित होते.या पुरस्कारांतर्गत रत्नागिरी नगर परिषदेला भरघोस निधी मिळाला.
www.konkantoday.com