संगमेश्वर तालुक्यात अवैधरीत्या गुरांची वाहतूक करणाऱ्या दोन गाड्या भाजप व शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी पकडल्या


कत्तल करण्याचे उद्देशाने अवैधरीत्या गुरांची वाहतूक करणाऱ्या दोन गाड्या संगमेश्वर तालुक्यातील हातीव व मारळ येथे भाजप व शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी रात्री पकडल्या आहेत. यानंतर या गाड्या देवरूख पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्या आहेत.
या दोन्ही गाड्यांमधून १५ गुरांची वाहतूक करण्यात येत होती. याप्रकरणी ६ जणांविरोधात देवरूख पोलिस देवरूख पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत ८ लाख ३५ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल देवरूख पोलिसांनी जप्त केला आहे.
याबाबत देवरूख पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, अमोल बुधाजी मांडवकर (रा. पुर्ये तर्फ देवळे, ता. संगमेश्वर) व वसंत चंद्राप्पा कांबळे (रा. चांदोली, आंबा, ता. शाहूवाडी) यांनी उदय दत्तात्रय मांगले (रा. साडवली, ता. संगमेश्वर) यांच्याकडून ४ बैल व १ गाय विकत घेतली. ही गुरे एकमेकांच्या संगनमताने कत्तल करण्याच्या उद्देशाने एका टेम्पोमधून प्राण्यांच्या वाहतुकीचा परवाना नसताना गाडीतून वेदना होईल, असे आखूड दोरीने बांधून दाटीवाटीने भरुन नेली जात होती. हातीव येथे मंगळवारी रात्री १०. ५ वाजण्याच्या सुमारास पकडण्यात आली. ही गाडी भाजपच्या कार्यकत्यांनी पकडली. दुसरीकडे महंमद दादन शेख, अल्ताफ पापूल जातकार व दस्कीर शेख ( रा. बेळगाव यांनी गुहागर तालुक्यातील शृंगारातळी येथील बुवा याच्याकडून ७ गायी व तीन पाडे विकत घेऊन ही गुरे एकमेकांच्या संगनमताने कत्तल करण्याच्या उद्देशाने बोलेरो पिकअकमधून प्राण्यांच्या वाहतुकीचा परवाना नसताना गाडीमधून वेदना होईल अशा पद्धतीने दाटीवाटीने भरुन नेली जात होती. मंगळवारी रात्री ११.५० वाजण्याच्या सुमारास मारळ बसथांबा येथे ही गाडी पकडण्यात आली. ही गाडी शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकत्यांनी पकडली याबाबत पोलिसांनी कारवाई केली आहे
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button