चार दिवस आलेल्या तापाने होतकरू तरुणाचा घेतला बळी
बारावी परीक्षेत चांगल्या मार्काने पास झाल्याने पुढील शिक्षणाची स्वप्ने बघणाऱ्या राजापूर पाचल येथील निखिल सुतार या होतकरू युवकाचा चार दिवस आलेल्या तापाने बळी घेतला. निखिल हा राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आत्माराम सुतार व पातळ पंचायत समिती सदस्य अमिता सुतार यांचा चिरंजीव होता.निखिल हा बारावी परीक्षेत विज्ञान शाखेतून पास झाला होता. पुढील शिक्षणाच्या प्रवेश मिळवण्यासाठी तो पुण्यासह इतर ठिकाणी धावपळ करत होता.चार दिवसा पासून त्याला सतत ताप येऊ लागल्याने त्याची तब्येत बिघडल्याने त्याला रत्नागिरीत उपचारासाठी दाखल करण्यात आले होते . परंतु तेथून कोल्हापूरला जाण्याचा सल्ला देण्यात आल्यानंतर तेथे नेत असताना त्याची वाटेत प्राणज्योत माळवली.
www.konkantoday.com