शहरात डास व माशांचे साम्राज,न-प चा आरोग्य विभाग सुस्त
पावसाळा सुरू होताच रत्नागिरी शहरात डास व माशांचे साम्राज्य झाले असून घरोघरी फवारणी करा हा नगराध्यक्षांचा आदेशही आरोग्य विभाग मानत नसल्याचे दिसत आहे त्यामुळे शहराच्या अनेक भागात डास प्रतिबंधक फवारणी झालीच नाही नगर परिषदेत पूर्वी डास फवारणीचे काम कंत्राटी पद्धतीने दिले जात होते परंतु त्यात घोळ होत असल्याने नगराध्यक्ष प्रदीप साळवी यानी याबाबत लक्ष घालून डास फवारणीची पंधरा मशीन नगर परिषदेद्वारे खरेदी केली शहरात विविध भागात फवारणी करण्याचे आदेश दिले परंतु त्यानंतर आरोग्य विभागाने हे काम पूर्ण केले नाही याबाबत तक्रारी झाल्यावर नगराध्यक्षांनी परत एकदा आरोग्य खात्यातील कर्मचाऱ्यांची कानउघडणी केलीआहे